बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि इतर आरोपींच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे डिजिटल पुरावे आता न्यायालयामध्ये सादर करण्यात आले आहेत. यामध्ये वाल्मिक कराडचा अबादा पवन चक्कीला केलेला फोन, तसेच विविध व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्सचा समावेश आहे. या पुराव्यांच्या यादीमुळे कराडसह विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या आरोपींचा जिल्हा कारागृहातील मुक्काम आता अधिक काळ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपास यंत्रणांनी सादर केलेले हे तांत्रिक पुरावे या खटल्यात अत्यंत कळीचे ठरणार आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराने कोणाशी संपर्क साधला आणि हत्येचा कट कसा रचला गेला, याचे धागेदोरे या पुराव्यांमुळे स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. न्यायालयाने हे पुरावे स्वीकारल्यामुळे आरोपींच्या जामीन अर्जावर किंवा पुढील सुनावणीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. बीड जिल्ह्यातील या बहुचर्चित हत्याकांडाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. #Beed #SantoshDeshmukh #CrimeNews #Maharashtra #SaamTV #ValmikKarad #BeedPolice #JusticeForSantoshDeshmukh #MarathiNews #CourtUpdate #DigitalEvidence #CrimeInvestigation #BeedCity #LegalNews #MaharashtraCrime

Abada Windmill phone callBeed Sarpanch murderBeed district jailBeed local newsBeed newsBeed policeMaharashtra crime newsMarathi newsSaam TV newsSantosh Deshmukh murder caseSarpanch murder investigationSudarshan GhuleValmik KaradVishnu Chateaudio video clips evidencecourt proceedings Maharashtracrime investigation Beedcriminal case evidencedigital evidence in courtdigital forensics crimelegal updates Maharashtra