#BolBhidu #WaqfBoardAmendmentBill #UddhavThackeray बुधवारी वक्फ सुधारणा विधेयकावरुन झालेल्या संपूर्ण चर्चेत सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते ठाकरे गटाच्या खासदारांकडं. ठाकरे गटाचे खासदार विधेयकाच्या बाजूनं मतदान करणार की इंडिया आघाडीत असल्यामुळं त्याला विरोध करणार, हा मोठा प्रश्न होता. विधेयकावर मतदान होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठाकरे गटानं आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. पण अखेर ठाकरेंच्या खासदारांनी वक्फ विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचं स्पष्ट झालं. त्याबाबत स्वतः उद्धव ठाकरेंनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपला वक्फ सुधारणा विधेयकापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या ढोंगाला आणि भ्रष्टाचाराला विरोध असल्याचं ठाकरेंनी सांगितलं. पण उद्धव ठाकरेंनी वक्फ विधेयकावरुन घेतलेली भूमिका त्यांना अडचणीत आणू शकते, असंही बोललं जातंय. वक्फ सुधारणा विधेयकाचं समर्थन करुन विरोधकांचे आरोप खोडून काढण्याची उद्धव ठाकरेंना शेवटची संधी होती, पण ती सुद्धा त्यांनी गमावल्याची आता चर्चा होतेय. या चर्चांमागची नेमकी कारणं काय, वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करुन ठाकरेंनी खरंच संधी गमावली का, समजून घेऊयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/