#BolBhidu #ChinaTariff #DonaldTrump चीन आणि अमेरिकेतील व्यापार तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनवरील 34% टैरिफमुळे चीननेही अमेरिकन उत्पादनांवार तितकाच कर लागू केला. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसमोर वाटाघाटीचा प्रस्ताव मांडला होता. परंतु चीनने कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी असाही अल्टीमेट दिला होता की, कोणत्याही देशाने प्रत्युत्तर दाखल अमेरिकेवर कर लादल्यास त्यांच्यावर पुन्हा नवीन कर आकारण्यात येईल. ट्रम्प यांच्या या धमकीनंतर लगेचच आज ट्रम्प प्रशासनाने चीनवर 104% आयात शुल्क लागू केल्याची घोषणा केली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक युद्धाची नवी सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या या करामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. चीनने या शुल्काला विरोध सुरूच ठेवला असला तरी या परिस्थितीशी लढण्यासाठी चीन आता समविचारी मित्र शोधत आहे असं दिसतंय. त्यामुळेच बीजिंगने आता भारताला मैत्रीचे आवाहन केले असून कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी भारताने आपल्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही केले आहे. काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊया, भारत चीनच्या आवाहनाला प्रतिसाद देईल का ? या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण जाणून घेऊया. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/