#BolBhidu #DonaldTrump #ChinaTariff अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६० हून अधिक देशांवर reciprocal tariff लादला ज्यामुळे जगभरातील अर्थव्यस्थाना मोठा फटका बसला. पण ट्रम्प काही त्यांच्या निर्णयावरून माघार घ्यायला तयार नव्हते. 'कधीकधी तुम्हाला काहीतरी बरे करण्यासाठी औषध घ्यावे लागते.' असे ट्रम्प म्हणत होते त्यामुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जात होती. आधीच चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांतील व्यापार तणाव वाढताना स्पष्ट दिसत होतं. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टैरिफ लादला. यावरून अनेक देशांत आर्थिक संकट ओढावणार असतानाच आता या निर्णयाला 90 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, चीनवर 125 टक्के कराची घोषणा कायम ठेवली आहे. थोडक्यात या सूटमध्ये चीनचा समावेश केलेला नाही, परंतु चीनवरील tariff १०४% वरून १२५% पर्यंत वाढवले आहे. चीनने प्रत्युत्तरादाखल ८४% शुल्क लादल्यानंतर ट्रम्प यांनी ही कारवाई केली. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की चीनने जागतिक बाजारपेठेचा आदर दाखवलेला नाही. म्हणूनच मी ते शुल्क १२५% पर्यंत वाढवत आहे. आशा आहे की चीन लवकरच समजेल की अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस संपले आहेत. ट्रम्प यांनी चीन संदर्भात कठोर भूमिका का घेतलेली आहे? तसेच ट्रम्प यांनी त्यांच्या निर्णयावरून माघार का घेतलेली आहे हे सर्व आज आपण सविस्तर समजून घेऊयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/