गीत - ग. दि, माडगूळकर संगीत - सुधीर फडके स्वर - सुधीर फडके कलाकार शाहीर अमरशेख चित्रपट - प्रपंच (१९६१) राग - तिलककामोद, देस (नादवेध फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार ! माती, पाणी, उजेड, वारा तूच मिसळसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार ! घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ! तूच घडविसी, तूच फोडिसी कुरवाळिसि तू, तूच ताडीसी न कळे यातुन काय जोडीसी ? देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार !