#BolBhidu #ChindukGhost #SolapurGhostStory आम्ही बसलेलो गावातल्या पारावर. सगळी तशी शांतच होतो, शांततेतची कारणं वेगळी होती, पण पारावर बसलेल्या पोरांचा ग्रुप लय वेळ शांत बसला म्हणजे एखादा कार्यकर्ता काहीतरी वाढीव बोलणार असतो, हे जगाच्या पाठीवर कुठंही लागू होणारं सत्य आहे. ही शांतता भंग झाली विकी कौशलच्या विषयामुळं. एक जण म्हणला, विकी कौशल आजारी ए माहिती का ? कॅटरिनाचं काय होईल या आशेनं दुसऱ्यानं विचारलं, लई सिरीयस ए का ? पण विषय तसा बेसिक होता. त्या दोस्तानं सांगितलं, विकी कौशल झोपेतून जागा व्हायचा, पण त्याला बॉडी हलवता यायची नाही. त्याला सगळं ऐकू यायचं, पण ओरडता यायचं नाही. पोरांनी लागलीच इमॅजिनेशनला बांध घातला, एक अभ्यासू कार्यकर्ता म्हणला, स्लिप पॅरालिसिस झाला असेल, होतंय बरं. पण बसायचं ठिकाण गावचा पार असल्यानं, चर्चेत बरेच पाहुणे सहभागी होते, त्यातच होते अप्पा म्हणले, अवघड ए, त्याला चिंदुक लागलं असल. चिंदुक म्हणजे काय ? तर भूत. पण चकवा, खवीस, झोटिंग, गिऱ्हा ही भुतं जागेपणी झोप उडवतात, पण चिंदूक झोपलेल्या माणसाची झोप उडवतं, त्याला ओरडायची संधीही देत नाही. या चिंदूक भुताचा विषय काय आहे ? त्याचं स्लिप पॅरालिसिसशी कनेक्शन काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/