#BolBhidu #KalpanaChawla #SunitaWilliams सुनीता विल्यम्स सध्या सगळीकडे चर्चेत असलेलं नाव, सुनीता विल्यम्स अंतराळात गेल्या होत्या फक्त आठ दिवसांसाठी, पण त्या स्पेस स्टेशनमध्ये अडकल्या, एक दोन दिवसांसाठी नाही तर नऊ महिने. या नऊ महिन्यात त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. पण तरीही त्यांनी हार मानली नाही, त्यांना पुन्हा पृथ्वीवर आणण्याचे प्रयत्न सुरु होते, जे अपयशी सुद्धा ठरले. पण त्यानंतर इलॉन मस्कच्या स्पेस एक्सकडे या प्रकरणाची जबाबदारी देण्यात आली आणि स्पेस एक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलनं सुनीता विल्यम्स १९ मार्चला पृथ्वीवर आल्या. भारतीय प्रमाणवेळेनुसार त्यांचं कॅप्सूल पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी फ्लोरीडाच्या समुद्रात स्प्लॅश डाउन झालं. एवढ्या रात्रीही सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर येताना पाहण्यासाठी कित्येक लोक जागे होते. एक भारतीय वंशाची महिला अंतराळातून परत येण्याची वाट बघणं हे भारतीयांसाठी पहिल्यांदा घडत नव्हतं, याआधी अशीच एका अंतराळवीराची वाट भारतीयांनी बघितली होती, पण बातमी अली होती, ती तिच्या अपघाताची. अंतराळवीर कल्पना चावलाचा अपघाती मृत्यू. एका बातमीनं तेव्हा सगळ्या भारताला धक्का दिला होता, या बातमीची सगळ्या जगभरात चर्चा झाली होती. पण कल्पना चावलासोबत नेमकं घडलेलं काय ? हा अपघात नेमका कसा झाला ? या अपघातामधून तिला वाचवता येणं शक्य होतं का ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/