#BolBhidu #ShirdiBeggarsDeath #Shirdi नगर जिल्ह्यातल्या शिर्डी पोलिस स्टेशन बाहेर बुधवारी रात्री मोठी गर्दी जमली होती. गर्दीत जमलेले काही लोक मोठमोठ्यानं आक्रोश करत होते. यात काही महिला आमची माणसं आम्हाला परत द्या, माझा बाप मला जिवंत आणून द्या, असा मोठमोठ्यानं टाहो फोडत होत्या. धक्कादायक गोष्ट म्हणजे या गर्दीतील लोकांनी थेट पोलिस स्टेशनबाहेरच दोन मृतदेह आणून ठेवले होते. या दोघांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा, अशा घोषणा देत या लोकांनी ठिय्या आंदोलन केलं. शिर्डीत हे सगळं का घडतंय, तर त्याला कारण आहे चार जणांचा मृत्यू. शिर्डी देवस्थान आणि प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी शिर्डीतील भिक्षेकरुंना ताब्यात घेण्यात आलं होतं. या भिक्षेकरुंचा चार जणांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली. शिर्डीत येणाऱ्या भाविकांना भिक्षेकरुंचा त्रास होतो म्हणून शिर्डी देवस्थान आणि पोलिस प्रशासनाकडून या भिक्षेकरुंना ताब्यात घेण्याची मोहीम राबवण्यात येते. पण या भिक्षेकरुंमध्ये काही सामान्य माणसांनाही जबरदस्ती नेण्यात आल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय. तसंच या भिक्षेकरुंना बंद खोलीत डांबून ठेऊन अमानुषपणे त्यांचे हात-पायही बांधण्यात आल्याचे आरोप केले जातायत. यावरुन साईंच्या शिर्डीत नक्की चाललंय काय, असाही प्रश्न विचारला जातोय. हे सगळं प्रकरण नक्की आहे काय, शिर्डीत भिक्षेकऱ्यांना ताब्यात का घेण्यात आलं आणि मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर केलेले आरोप काय, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/