#BolBhidu #TilakVarma #LSGVsMI मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स मॅच. ही मॅच एकदम घासून झाली. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली. आता फिनिशर हार्दिक पांड्या क्रिजवर आहे म्हटल्यावर मुंबईच्या जिंकण्याचे चान्सेस जास्त वाटत होते. त्यात हार्दिक फॉर्ममध्ये होता. बॉलिंगमध्ये त्यानं त्याच्या करिअरमधला बेस्ट परफॉरमन्स दिला होता. त्यामुळं आता तो बॅटिंगमध्येही धुव्वा करेल, असं वाटत होतं. पण तसं काही घडलं नाही. मॅच मुंबई इंडियन्सनं १२ रन्सनं हारली. आता मॅचनंतर हार्दिक रन्स चेस करू शकला नाही, याची चर्चा होणं अपेक्षित होतं, पण त्याऐवजी चर्चा होतीये ती दुसऱ्याच एका प्लेअरची. हा प्लेअर म्हणजे मुंबईचा बॅटर तिलक वर्मा. ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे मॅचमधला एक निर्णय. मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला तिलक वर्मा रिटायर्ड आऊट होऊन बाहेर गेला. आपण गल्ली क्रिकेटमध्ये एखाद्या प्लेअरला खेळता येत नाही म्हणून बाहेर बसवतो तसं काहीसं तिलकसोबत लखनौ विरुद्धच्या मॅचमध्ये झालं. तिलक हा मुंबईनं रिटेन केलेला प्लेअर. अशा सिच्युएशनमध्ये तो यापूर्वी अनेकदा खेळला आहे. मग यावेळी त्याला रिटायर्ड आऊट का करण्यात आलं? तिलक खरंच इतका खराब खेळला होता का? हा निर्णय कॅप्टन हार्दिकचा होता की कोच जयवर्धनेचा? पाहूयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/