#BolBhidu #FuelPriceIndia #BalliaCrudeOil आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्चा तेलाच्या किमतींमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळतोय. सोमवारी, ७ एप्रिलला कच्चा तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड घसरण झाली. गेल्या काही आठवड्यांपासून सातत्यानं ही घसरण सुरू आहे. गेल्या चार वर्षांतल्या कच्च्या तेलाच्या सगळ्यात कमी किंमती आता आहेत. आता कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारेच देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवले जातात. त्यामुळं कच्चं तेल स्वस्त झालं म्हणजे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होणार असं साधं गणित लावलं जातं. पण तरीही भारतात अजूनही पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेले नाहीत. आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या दाव्यानुसार सध्या देशात पेट्रोल ५१ रुपये आणि डिझेल ४१ रुपये प्रतिलीटर दरानं मिळू शकतं. पण तरीही सरकार तसं करत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. आता जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती घसरलेल्या असताना भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतीं कमी का होत नाहीत, कच्चं तेल आणि पेट्रोल डिझेलच्या किंमतींचं कनेक्शन काय आणि किंमती कमी करण्याबाबत सपकाळांचा नक्की दावा काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/