#BolBhidu #WaqfAmendmentBill #WaqfBoard या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संसदेत वक्फ बोर्ड सुधारण विधेयक सादर करण्यात आले. लोकसभेमध्ये हे विधेयक पारित झाले. यानंतर राज्यसभेमध्ये देखील हे विधेयक सादर करण्यात आले होते. दीर्घ चर्चेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मतं मिळाली. तर राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने 185 आणि विरोधात 95 मतं मिळाली. आता राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर याचे कायद्यामध्ये रूपांतर होईल. यावर चर्चा होत असताना दोन्ही सभागृहात विरोधी आणि सत्ताधारी पक्षानेदेखील आपली भूमिका जाहीर केली. विरोधकांकडून या विधेयकाला असंवैधानिकसुद्धा ठरवण्यात आले तर एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या विधेयकाला विरोध करताना विधेयकाची प्रत सभागृहात फाडली. हा विरोध होत असताना सरकारकडून हे वारंवार स्पष्ट केलं गेलं की, नव्या वक्फ बोर्ड कायद्यानुसार, कोणताही गैर मुस्लिम व्यक्ती याचा सदस्य नसेल. देणगीसाठी देण्यात आलेल्या निधीचा वापर योग्य पद्धतीने होतोय का नाही हे पाहणे वक्फ बोर्डचे काम असेल. तसेच त्यामध्ये इस्लामी धर्माच्या श्रद्धेमध्ये कोणताही हस्तक्षेप करण्याची सरकारची इच्छा नसल्याचं अमित शाहांनी स्पष्ट केलं आहे. याच मुद्द्याला धरून आज आपण माहिती घेऊयात या वक्फ सुधारणा विधेयक याची आणि त्याद्वारे कोणते सकारत्मक बदल होतील याची. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/