#BolBhidu #SoundaryaDeath #MohanBabu सूर्यवंशम... बिग बी अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट सिनेमा... १९९९ मध्ये रिलिज झालेला हा सिनेमा आजही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. सिनेमातली हीरा ठाकूरची सक्सेस स्टोरी चाहत्यांना चांगलीच आवडली होती. या सिनेमात बच्चन साहेबांच्या डबल रोलची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा हीरा ठाकूरच्या मागं ठामपणे उभं राहणाऱ्या राधाचीही झाली. पण ती राधा सूर्यवंशम नंतर कोणत्याही बॉलिवूड सिनेमात कधीच दिसली नाही. त्याचं आजही अनेकांना आश्चर्य वाटतं. त्या अभिनेत्रीचं नाव म्हणजे सौंदर्या. सौंदर्या ही खरंतर साऊथची अभिनेत्री, पण सूर्यवंशम या एका सिनेमानं तिला बॉलिवूडमध्येही चांगली ओळख मिळवून दिली. पण सूर्यवंशम हा सौंदर्याच्या करिअरमधला पहिला आणि शेवटचा बॉलिवूड सिनेमा ठरला. याचं कारण म्हणजे सौंदर्याचं अकाली झालेलं निधन. २००४ मध्ये विमान अपघातात तिचा मृत्यू झाला. अवघ्या ३१व्या वर्षी तिचं निधन झाल्यानं त्यावेळी इंडस्ट्रीतूनही हळहळ व्यक्त करण्यात आली. पण सौंदर्याच्या अचानक झालेल्या मृत्यूवरून आता तब्बल २१ वर्षांनी मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. सौंदर्याचा अपघात नाही तर तिची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा आता करण्यात आलाय. इतकंच नाही तर याबाबत साऊथच्या ज्येष्ठ अभिनेत्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आलीय. संपत्तीच्या वादातून सौंदर्याची या अभिनेत्यानं हत्या केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय. मुख्य म्हणजे हा अभिनेता आणि सौंदर्याची जोडी ही त्याकाळी साऊथमधली सगळ्यात हीट जोडी होती. पण याच अभिनेत्यावर आरोप झाल्यानं आता मोठी खळबळ उडालीय. हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय, सुर्यवंशम फेम सौंदर्याचा मृत्यू कसा झाला आणि त्यावरुन साऊथच्या अभिनेत्यावर होणारे आरोप नक्की काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/