#BolBhidu #SantoshDeshmukh #WalmikKarad "जो तो उठेल आणि आपल्या आड येईल. अशाने आपण भिकेला लागू. आपण कुणालाही सोडणार नाही. विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल" हे वाल्मिक कराडचे शब्द असल्याचं संतोष देशमुख हत्याप्रकरणातल्या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ६ डिसेंबरच्या राड्यानंतर ७ डिसेंबरला कराडनं सुदर्शन घुलेला आडवा येईल त्याला आडवे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कराडची टोळी मृत संतोष देशमुखांच्या मागावर होती. ९ डिसेंबरला देशमुख कुठे आहेत याची माहिती काढून आरोपींनी देशमुखांचं अपहरण करून हत्या केली. या प्रकरणी दाखल झालेले खंडणी, ॲट्रोसिटी आणि हत्या हे तीनही गुन्हे फक्त खंडणी या मोटिव्हमधूनच झाल्याचं चार्जशीटमध्ये स्पष्ट झालंय. मात्र ॲट्रोसिटीतील ज्ञानेश्वर रणजीत मुळे आणि देशमुख कुठे आहेत याची टीप देणारा सिद्धार्थ सोनवणे यांची इतर नावं चार्जशीटमधून वगळण्यात आली आहेत. यातूनच देशमुख हत्या प्रकरणाला ट्विस्ट मिळणार असल्याची चर्चा आहे. पण सोनवणे आणि मुळे यांची नावं चार्जशीट मधून का वगळण्यात आली आहेत ? या प्रकरणात माफीचा साक्षीदार महत्त्वाचा ठरु शकतो का ? पाहुयात या व्हिडीओमधून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/