तुझ्या येण्यानं, जीवनाच सोनं झालं गं | tujhya yenyan | valaki bhajan | #ajit walaki जनार्दन सुतार ही कापडं काय तुझ्याकडं जेवाण मागल्यात व्हयं. औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील जनार्दन सुतार यांच्या घरी मला जाण्याचा योग आला. निमित्त होते सद्गुरु संत बाळूमामा यांनी स्वतः वापरलेल्या कपड्यांचे पूजन. दरवर्षी माग वद्य एकादशीला त्यांच्या घरी असलेल्या बाळू मामांच्या कपड्यांचं पूजन होतं. तर त्यानिमित्तानं त्यांच्याशी झालेली ही बाचतिच. दर माघ वद्य एकादशीला तुमच्या घरी बाळू मामाच्या कपड्यांचं पूजन होतंय. तर ती बाळूमामांची कपडे तुमच्या घरी कशी आली ? - बांळू आपल्या गुरव औरनाळ यांचे पाहुणे अक्कोळ (ता. हुक्केरी, कर्नाटक) येथे आहेत. पाहुण्यांच्या नात्यानं त्यावेळी बाळूमामा त्यांच्या घरी येऊ लागले. बाळू गुरव व आमचे आजोबा धोंडीबा सुतार यांची मैत्री होती आणि त्यांच्यामुळेच आमचे सद्गुरु संत बाळूमामाशी संबंध वाढले आणि पुढे एकदमच दृढ झाले. काहीतरी मागल्या जन्मीचे ऋणानुबंधनच असणार! गुढीपाडवा झाल्यानंतर औरनाळ येथे त्यावेळी बकरी येत होती. त्यावेळेपासून आमची आजी आणि आजोबा बाळूमामांना जेवण घेऊन जात होते. मग ही कपडे तुमच्याकडे कशी काय आली ? - पूजा करुन ती आदमापूर मंदिर येथे पाठवून दिली. म्हणजे आता तुमच्या घरी सद्गुरु संत बाळूमामांची ही पाच कपडे आहेत. • पार्ट ८ जनार्दन सुतार अद्वितीय अशी ही माणसं आणि कृपा त्या सद्गुरु संत बाळूमामांची तुमचं आता सध्याचं वय काय आहे ? माझं आता ७० वर्ष वय चालू आहे. मग मामांना तुम्ही पाहिलाय मामा हयात होते त्यावेळी तुमचं वय काय होत ? मी १० वर्षाचा असल्यापासून आमच्या आजी- आजोबांबरोबर जाणार बाळूमामांच्याकडे. मामांना मग तुम्ही बघितलाय. कसे होते मामा ? - निमगोरा, गडूवर्णाचा असा रंग होता आणि तांबडा फेटा असणार रुमाल म्हणत होते त्याला त्यावेळी. ते त्यांची कपडे १५ दिवसातून एकदाच द्वादशीला अंघोळ केल्यानंतर कपडे बदलणार. १५ दिवस त्यांच्या अंगावर तीच कपडे असूनही त्यांच्या कपड्यांची इस्त्री अगदी जशीच्या तशी असणार. आणखीन सांगा की त्यांच्याविषयी. कारण तुम्ही प्रत्यक्षात बघितलाय मामांना! तुमच्या कडूनच आम्हाला समजणार मामा कसे होते ते ? - रानातच असायचे. तंबू असायचा बकऱ्याच्या तळावर. तंबूमध्येच ते रात्री झोपत होते. सकाळी जेवण झाल्यानंतर तळावरून बकरी चरायला निघणा मग त्यांच्याबरोबर मामाही बाहेर पडत असत. संगे त्यांच्या माणसे असत. ज्या ठिकाणी बकरी चरायची त्या ठिकाणी कुठतरी झाडाच्या सावलीत बसायचे. त्यावेळी मग तिथं कुणीतरी 'बाळूमामा आलं' म्हणून चार चौघे माणसे जमत. मग त्यांचा तिथंच मामांच्याबरोबर संवाद चालायचा. मला वाटतंय औरनाळ, शेंद्री, भडगाव या पंचक्रोशीत मामाचं वास्तव्य खूप वर्षे होतं. आपल्या हा भाग म्हणजे पुण्यभूमीच आहे. • होय, सगुरु बाळूमामस्पर्शां पावन पावन पदांच्या अधिकार आहे ही. म्हणूनच भागात सुजलाम सुफलाम झाला आहे. (मित्रांनो, आपल्याला या कपड्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर माझा युटूब चॅनलवर Satoosh Shanoo Ranit बाळूमामा कृपा पार्ट ८ पहा.) पार्ट १० - 'हय समाधान मान, तू सुतार धंदाच कर' तुम्हाला तुमच्या आयुष्यात आलेला सद्गुरु संत बाळूमामांविषयी अनुभव सांगा. ज्या वेळी मी शाळा सोडली त्यावेळी आमचे आजोबा वारले. १९६६ साल होतं बहुतेक ते. आजोबा वारल्यानंतर घरची जबाबदारी माझ्यावरच आली. वडील होते. पण आजोबा वारल्यानंतर आमच्या घरची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यावेळी आमची आजी सद्गुरु बाळूमामांना म्हणाली, माझा नातू जनार्दन पोलिसात भरती व्हतो म्हणालाय मामा आणि मी काय करू पाठवून देऊ काय त्येला ? त्यावेळी मामांनी तिला सांगितलं बकरी ज्यावेळी खालत (कर्नाटकमध्ये) जातात त्यावेळी माझ्याकडं पाठवून दे. बकरी पाठवून द्यायला. मग मी बकरी पाठवून देण्यासाठी मामांबरोबर यंगटापूरला गेलो. औरनाळ शेंद्रीची अशी मिळून एक २५ ते ३० माणसं बरोबर होती. यंगटापूरला मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावाकडं परत येताना बाळूमामा प्रत्येकाला भंडाऱ्याची पुडी आणि परतीच्या प्रवासाचे गाडी भाडे देत होते. मग त्यावेळी प्रत्येकाने घेतला भंडारा आणि माझी पाळी आल्यानंतर मी बाळूमामांना नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर बाळूमामा मला 'खाली बस' म्हणाले आणि मग त्यावेळी त्यांनी मला सांगितल. नोकरी करतो म्हणून घर सोडून कुठं बी जायाचं नाही. गेलास तर पायतानानं मारीन लेका. तु सुतार धंदाच कर आणि मिळल त्यात समाधान मान. त्यावेळी एवढं काय मला कळत नव्हतं. वय लहान होतं. मग त्यांनी तसं सांगितलं असताना देखील मी एक दोन ठिकाणी ट्रायल घेतली मी (नोकरीसाठी प्रयत्न केला) कंडक्टर लायसन काढली.. आय.टी.आय. साठी देखील कोल्हापूरला माझी निवड झा. मी तिथं रुज्जू झालो होतो. आठ दिवस तिथं मला पीटर ट्रेड दिला होता आणि आठ दिवसानंतर अचानकच ते म्हणाले, की तुमचं नाव कमी केलंय आणि पुढच्या वर्षी तुम्हाला घेण्यात येईल. तुम्ही आता घरी जात. मग त्यावेळेपासून मी नोकरीचा विषयच सोडून दिला. मग त्यावेळेपासून मी आता सुतार धंदाच करतो आणि आता त्यांच्या सेवेतच आहे मी. प्रत्येक एकादशीला आदमापूरला असतो. कोण कलाकार असतील त्यांना बोलावून त्यांची कला सादर करवून आहे सर्वसाधारण हे सगळे कलाकार निरपेक्ष भावनेनं आपली कला सादर करतात.