#BolBhidu #GoldPrice #goldrate गेल्या काही काळापासून सोन्याचे भाव कमी होतील म्हणून जे वाट बघत असतील त्यांचा आता भ्रमनिरास झाला असणार कारण सोनं all time high आहे. सोन्याने दोन दिवसाआधी ९० हजारचा आकडा पार केलेला दिसला होता. आज प्रति १० ग्रॅमनुसार २४ कॅरेट सोन्याचा भाव ९०,४४० रुपये आहे. सोन्याचे भाव वाढल्यामुळे ते आता गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. काल आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल आणि देशांतर्गत आघाडीवर देखील ग्राहकांनी खरेदी सुरू राहिल्याने नवी दिल्लीत सोन्याच्या किमती ५०० रुपयांनी वाढून ९१,२५० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या होत्या. सोन्याच्या तुलनेत चांदी सुद्धा मागे राहिलेली नाही. काल चांदीचा भाव देखील प्रति किलो १,०२,५०० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकांवर पोहोचला होता. आज त्याही पलीकडे जात चांदीचा भाव एक किलोप्रमाणे १,०५,००० रुपये इतका झालेला आहे. आज आपण माहिती घेऊ सोने इतके महाग का असते याची आणि सध्या सोने महाग का झाले आहे यामागची कारणं. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/