#BolBhidu #DonaldTrumpTarrifs #IndianShareMarketCrash जगभर मंदीच सावट असताना ज्यांच्याकडून संपूर्ण जगाला अपेक्षा होती त्या अमेरिकेने ,, नाही त्यांच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या बेभरोशी धोरणांमुळे, बेताल वक्तव्यांमुळे, कुणालाही न जुमानता घेतलेल्या मनमानी निर्णयामुळे जागतिक व्यापार युद्ध छेडले आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये अमेरिकेसहित जगभरातील सगळ्या प्रमुख अर्थव्यवस्था होरपळून निघत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 देशांवरती tariff लावण्याची घोषणा केली. त्यानंतर भारत आणि आशियाई मार्केटने ब्लॅक मंडेचा अनुभव घेतला. सोमवारी थोडीशी परिस्थिती अजून बिकट होईल असा अंदाज असताना भारतात बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स ३००० तर निफ्टी ११०० अंकांनी घसरला. भारतीय शेअर मार्केट मधून सकाळच्या सत्रमध्ये तब्बल 19 लाख कोटी रुपये wiped out झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते ही घसरण काहीच नाही, जर परिस्थिती नियंत्रित केली नाही तर अमेरिकन बाजाराची स्थिती १९८७ सारखी होऊ शकते. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिकीकरण संपून व्यापार युद्ध सुरु होईल, ही भीती व्यक्त केली जात आहे. हा टॅरीफचा संपूर्ण विषय समजून घेऊ तसंच ट्रम्प यांच्या भूमिकेचे संभाव्य परिणाम, या व्हिडिओतून समजून घेऊयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/