#BolBhidu #TrumpTariffs #TariffsExplained ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतर जगभरात मंदीची चिंता वाढू लागली आहे. जगभर मंदीची भीती अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात असून जगातील काही प्रमुख अर्थव्यवस्था दबावाखाली आल्याने त्यात अमेरिकेची भर पडल्याने मंदीचा धोका आणखी वाढला आहे. मुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करणे महागात पडू शकते. भारतीय उत्पादनांवर जास्त कर लादल्याने अमेरिकन ग्राहकांना महागड्या वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले जाऊ शकते. भारतातून कच्चा माल किंवा तयार उत्पादने आयात करणाऱ्या अनेक अमेरिकन कंपन्यांच्या किमतीही वाढू शकतात. यामुळे जागतिक व्यापार युद्ध सुरू होऊ शकते. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह या थिंक टँकनं केलेल्या विश्लेषणानुसार, शेतीतील सर्वाधिक प्रभावित क्षेत्रे मासे, मांस आणि प्रक्रिया केलेले सीफूड असतील. २०२४ मध्ये त्याची निर्यात २.५८ अब्ज डॉलर्स होती. अमेरिकेला होणारी प्रमुख निर्यात असलेली कोळंबी अमेरिकेचे शुल्क लागू झाल्यानं तुलनेने कमी स्पर्धात्मक होईल. अजून एक सेक्टर आहे ज्यावर या टॅरिफचा मोठा परिणाम होईल असं सांगितलं जात आहे ते म्हणजे आयटी सेक्टर. यावर या टॅरिफचा काय परिणाम होईल, ते जाणून घेऊया. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/