#BolBhidu #DishaSalian #AadityaThackeray दिशा सालियन. बॉलिवूड अभिनेता सुशांत राजपूतची माजी मॅनेजर. मृत्यू दिनांक ८ जून २०२०. म्हणजे जवळपास पाच वर्षांपूर्वी दिशाचा मृत्यू झाला. पण आजही दिशाचा विषय चर्चेत येतो, पण महाराष्ट्राच्या राजकारणात. दिशाच्या मृत्यूवरुन माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाले. हे आरोप पत्रकार परिषदेमध्ये झाले, जाहीर सभेतून झाले. या प्रकरणाची सीबीआयनं चौकशी केली, एसआयटीची चौकशी झाली, पण तेव्हा आदित्य ठाकरेंना क्लीनचिट दिल्याची बातमी आली. पण आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं कारण दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेली एक याचिका. या याचिकेत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, सोबतच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोलिस अधिकाऱ्यांवर सुद्धा आरोप केले आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे ? दिशा सालियनच्या वडिलांनी नेमके काय आरोप केले आहेत ? या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आतापर्यंत काय आरोप झाले आहेत ? आणि आता या नव्या याचिकेमुळं आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार का ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/