#BolBhidu #IncomeTaxSlab #UPI आजपासून म्हणजेच १ एप्रिल २०२५ पासून नवीन कर वर्ष सुरू होत आहे. दर महिन्याप्रमाणे, याही महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशात आर्थिक आघाडीवर अनेक मोठे बदल लागू केले जातील, ज्याचा परिणाम प्रत्येक घरात आणि प्रत्येकाच्या खिशावर पडणार आहे. हे बदल एलपीजी सिलिंडर, तुमचे बँक खाते, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या किमतींमध्ये दिसून येतील. यासोबतच म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड, UPI व्यवहार, कर आणि GST शी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. या सर्व बदलांचा उद्देश पारदर्शकता वाढवणे, गुंतवणूकदारांचे संरक्षण सुनिश्चित करणे आहे. यासोबतच आता महामार्गावरून प्रवास करणेसुद्धा महाग होऊ शकते, कारण अनेक मार्गांवर टोल वाढणार आहे. अजून एक मुद्दा म्हणजे या नव्या आर्थिक वर्षसाठी प्राप्तिकराच्या नव्या करप्रणालीमधील दरात बदल करण्यात आले आहेत. हे बदल वैयक्तिक करदाते, हिंदू अविभक्त कुटुंब, कंपनी, भागीदारी फर्म आदी विविध गटातील करदात्यांसाठी लागू असणार आहेत. आजपासून कोण कोणत्या गोष्टी बदलणार आहेत हे सविस्तर जाणून घेऊ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/