#BolBhidu #RBIRepoRate #MonetaryPolicy अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच अनेक देशांवर रेसिप्रोकेल टॅरीफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे जगभरातल्या बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. याचा परिणाम सोमवारी भारतातल्या मार्केटवरही दिसला. या निर्णयामुळे भारतातला शेअर बाजार कोसळला, तर सेन्सेक्स जवळपास २३०० आणि निफ्टी ८०० अंकांनी पडला. टॅरीफच्या या सगळ्या गोंधळलेल्या पार्श्वभूमीवर बुधवारी ९ एप्रिलला आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीची बैठक झाली. या बैठकीतून काहीतरी चांगला निर्णय येईल, अशी आशा इन्वेस्टर्सना होती. सध्याच्या बाजाराची स्थिती बघता, आरबीआय रेपो रेट कमी करेल अशा चर्चा होत्या. आरबीआयनं गेल्या पाच वर्षात रेपो रेट कमी केले नव्हते. २०२३ पासून यात सातत्यानं वाढ होत होती. यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत आरबीआयनं रेपो रेट मध्ये २५ बेसिस पॉईंट्सची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बुधवारच्या बैठकीत आरबीआयनं पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय. या बैठकीत आरबीआयनं आणखी कोणते महत्वाचे निर्णय घेतले? बैठकीत जीडीपी वाढीच्या संदर्भात काय सांगण्यात आलंय? तसंच रेपो रेटमध्ये कपात करण्याचा मध्यमवर्गीयांना कसा फायदा होऊ शकतो. या सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/