#BolBhidu #PrakashAmbedkar #SomnathSuryawanshi मंगळवारी सकाळी एक बातमी आली. परभणी हिंसाचार प्रकरणात तुरुंगात मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशींची केस प्रकाश आंबेडकर लढणार. या बातमीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर माध्यमांमध्ये वकिलांचा काळा कोट घातलेले प्रकाश आंबेडकरही कोर्टाबाहेर दिसले. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अशी प्रकाश आंबेडकरांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय. त्यांनी आजवर दलित समाजाच्या उद्धारासाठी केलेलं काम आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून मांडलेली आपली राजकीय विचारसरणी सगळ्यांना ठाऊक आहे. पण त्याच प्रकाश आंबेडकरांना दलित समाजातील सोमनाथ सुर्यवंशी यांची केस लढायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी एखाद्या मुरलेल्या वकिलाप्रमाणं केसचा अभ्यासही केल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळं त्यांची एक कसलेला वकील अशीही ओळख महाराष्ट्राच्या समोर आलीय. पण त्यांची ही ओळख महाराष्ट्राला काही नवीन नाही. पेशानं वकील असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी याआधीही अनेक केसेस लढल्याचं सांगितलं जातंय. सोमनाथ सूर्यवंशींची केस घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी याआधी लढलेल्या केसेसचीही चर्चा होतेय. प्रकाश आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशी केसमध्ये मंगळवारी कोर्टात नक्की कसा युक्तिवाद केला, याआधी प्रकाश आंबेडकरांनी लढलेल्या केसेस कोणत्या, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/