#BolBhidu #ShaneWarne #Kamagra 4 मार्च 2022 यादिवशी एक बातमी आली होती, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नचा मृत्यू. वयाच्या ५२ व्या वर्षी मृत्यू झालेला वॉर्न फार आधीच क्रिकेटमधून रिटायर झाला होता. पण आयपीएल, कोचिंग यामधून तो फॅन्सशी कनेक्टेड होता. त्यामुळं वॉर्नचा मृत्यू हा अनेक फॅन्ससाठी धक्का होता. वॉर्नच्या मृत्यूचं कारण सांगण्यात आलं, हार्ट अटॅक. वॉर्न जेव्हा क्रिकेट खेळत होता तेव्हाच त्याचं आणि फिटनेसचं बिनसलेलं होतं, त्यानंतर तर सगळा आनंदच होता, त्यामुळं वॉर्नला हार्टअटॅक येऊच शकतो, अशी चर्चा तेव्हा झाली. त्यात तेव्हा कोरोनाची लस, त्याचे कथित परिणाम अशा अनेक चर्चा झाल्या आणि शेन वॉर्नचा हार्ट अटॅकने मृत्यू, हीच बातमी सगळीकडे चर्चेत राहिली. पण आता वॉर्नच्या मृत्यूनंतर ३ वर्षांनी एक वेगळाच दावा करण्यात आला आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलंय की, वॉर्नचा मृत्यू हार्टअटॅकने झाला नाही, तर त्यानं एक भारतीय बनावटीचं औषध घेतलं होतं, त्याचे दुष्परिणाम त्याच्यावर झाले. औषधाचं नाव सांगण्यात आलं कामाग्रा. पण शेन वॉर्नचा मृत्यू खरंच या औषधामुळे झाला का ? त्याच्या मृत्यूचं कारण लपवण्यात का आलं ? थायलंडमधल्या घटनेत ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांचा संबंध होता का ? आणि खरंच ते औषध घेतल्यानं मृत्यू होऊ शकतो का ? सगळ्या पश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/