#BolBhidu #PuneCrime #MayuriDangde पंधरा दिवसांवर लग्न आलं होतं, फक्त १५ दिवसांवर. होणाऱ्या बायकोचा फोन आला, आपण पिक्चरला जाऊयात का ? आदल्या दिवशी प्री वेडिंग शूट झालं होतं, रोज फोनवर बोलणं सुरु होतं, सगळे अगदी गुलाबी दिवस सुरु होते. त्यात एका नव्या गुलाबी दिवसाची भर पडणार होती. हे दोघंच जण, बाईकवरचा प्रवास मग हडपसरच्या सीझन्स मॉलमध्ये दोघांनी बघितलेला पिक्चर या दोघांचं खरंतर अरेंज मॅरेज होतं, पण सगळं काही अगदी भारी चाललेलं. त्यात पिक्चर वरुन परत येताना भावी नवरदेव अगदी निवांत होता. आतापर्यंतचं आयुष्य कसं होतं, लग्न ठरल्यानंतरचं आयुष्य कसं आहे आणि आता फक्त पंधरा दिवस राहिले, असं सगळं त्याच्या डोक्यात सुरु होतं. आपल्या आयुष्याची स्क्रिप्ट लिहीणाऱ्याचे त्याने मनातून आभार मानले आणि तेवढ्यात सिन झाला चेंज. एक फोर व्हीलर आली, धुराळा उडवत थांबली, गाडीतून काही माणसं उतरली आणि आपल्या हिरोला बेदम मारहाण केली. स्क्रिप्टमध्ये अचानक चेंज होता कारण स्क्रिप्ट हिरोच्या आयुष्यातल्या हिरोईननं लिहिली होती. ऐकायला फिल्मी वाटत असलं, तरी हे प्रत्यक्षात घडलंय आणि तेही पुण्यात, यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत, खामगावमध्ये. सुरुवातीला हे सगळं स्थळ पसंत नाही म्हणून नवरीनं घडवलं अशा चर्चा झाल्या, पण पोलिसांच्या तपासात या घटनेमागचं सत्य समोर आलं, ते धक्का देणारं होतं. ही नेमकी घटना काय आहे ? यात ट्विस्ट काय आहेत ? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडीओ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/