#BolBhidu #TrumpTariffs #GlobalRecession ट्रम्प सत्तेत आल्यापासून सर्वाना फेअर ट्रेड विषयी बोलत होते. सर्व देशांना सामान संधी असायला हवी, दोन्ही बाजूला विन सिच्युएशन असावी अशी त्यांची मागणी होती. पण कोणी या बाबी सिरियसली घेतल्या नाहीत आणि अचानक मागच्या आठवड्यात ट्रम्प यांनी ‘लिबरेशन डे टॅरिफ्स’ ची घोषणा केली आणि नंतर बाजारात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांना १९८७ नंतर प्रथमच इतके नुकसान झाले. जगभर मंदी येणार याची चर्चा सुरु झाली असताना ट्रम्प यांच्यावर या सर्व चर्चांचा, मार्केटचा परिणाम झालेला नाही आणि ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. पण याची दुसरी बाजू अशी आहे की आता अमेरिकेत आर्थिक मंदीचे संकट वाढलं आहे. अमेरिकेत मंदी आल्यास त्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. 'ब्लूमबर्ग'ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा मोठा फटका अमेरिकेला बसणार आहे. अमेरिकेचा जीडीपी -0.3 टक्के पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्याआधी जीडीपीचा अंदाज 1.3 टक्के इतका वर्तवण्यात आला होता. त्याचा परिणाम नोकरभरतीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याही पुढे जाऊन ब्लूमबर्गने अमेरिकेतील बेरोजगारीचा दर 5.3 टक्के होण्याची शक्यता वर्तवली आहे. हीच परिस्थिती जगभर आहे असं म्हणल जातंय. पण खरंच जागतिक मंदी येणार का? काय असते जागतिक मंदी? यावर जगभरातील तज्ज्ञ काय म्हणत आहेत? काय चर्चा होत आहेत ? अहवाल काय सांगतात हे सर्व आज आपण जाणून घेऊया. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/