#BolBhidu #IPL2025 #BCCI सिस्टम फाड देंगे, असं आम्ही नाही आयपीएलमधले बॉलर्स म्हणणार आहेत. कधीपासून तर पहिल्या मॅचपासून. कसंय २० तारखेपर्यंतची गोष्ट वेगळी होती, बॉलर्सला टेन्शन होतं, बाकीच्यांचं सोडा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मॅच असेल तर काय होईल, याचा लोड लई. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी हे चार जण सुरुवात करणार आणि यांचं मारुन भागलं की हेन्रीच क्लासेन येणार असा सगळा विषय. त्यात मागच्या आयपीएलला ३०० च्या टप्प्यात स्कोअर गेल्यात जमा होता, त्यामुळं यंदा ३०० होईलच अशी पैज अनेक जण लावत होते. कित्येक जण तर आयपीएलमध्ये बॅटर्सला लई फायदा होतो, त्यामुळं आयपीएल बघण्यासारखा विषय नाय असंही म्हणतात, पण सगळं चित्र यावेळी बदलू शकतं. बॅटर्सचं टेन्शन वाढू शकतं आणि बॉलरला फायदा होऊ शकतो, याचं कारण म्हणजे आयपीएलनं आणलेले दोन नियम. बॉलला लाळ लावता येणार आणि दुसरा बॉल वापरता येणार, हे दोन नियम गणित कसं बदलू शकतात, याचा बॉलर्सला कसा फायदा होऊ शकतो ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/