#BolBhidu #SantoshDeshmukh #Beed संतोष पंडितराव देशमुख, बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे माजी सरपंच. सगळ्या वयोगटातल्या माणसांशी कनेक्ट असलेले आणि गावात अनेक विकासाची काम केल्यानं लोकप्रिय असलेले व्यक्ती. सध्या मस्साजोगच्या सरपंच अश्विनी देशमुख या संतोष देशमुख यांच्या पत्नी. त्यामुळं माजी सरपंच असले, तरी त्यांचा गावाशी, गावातल्या लोकांच्या कामाशी रोजचा संबंध. पण याच मस्साजोगमधली लोकं अहिल्यानगर-अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत होती, केजमध्ये लोकांनी एक बस सुद्धा पेटवून दिली. पण या सगळ्यामागे कारण काय होतं ? तर माजी सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करुन मग झालेली हत्या. ९ डिसेंबरला भर दुपारी देशमुख यांचं रस्त्यावरुन अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर लोकांना सापडला तो त्यांचा रस्त्यावर पडलेला मृतदेह. फिल्मी स्टाईल अपहरण, मग हत्या आणि आरोपींना अटक, मस्साजोगमध्ये नेमकं काय घडलं ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/