#BolBhidu #PrasannaShankar #DhivyaSashidhar एका आयटी प्रोफेशनलनं, एका मोठ्या स्टार्टअपच्या फाउंडरनं केलेलं ट्विट, ज्यात त्याचे आपल्या मुलासोबतचे फोटो होते, काही स्क्रीनशॉट्स होते आणि एक गोष्टही होती. गोष्ट होती, त्याची स्वतःची. स्क्रीनशॉट्समधले चॅट्स आपल्या बायकोचे असल्याचा आरोप त्यानं केला, यात काँडोम्स आणायला सांगणं, हॉटेल बुक केलंय हे सांगणं अशा अनेक गोष्टी होत्या. आपल्या बायकोचं अफेअर असल्याचं आपल्याला समजलं, त्यानंतर घटस्फोटाची केस सुरु झाली, पण बायको आता आपल्यावर खोटे आरोप करत आहे, तिला महिन्याला ४ लाख रुपये दिले जात आहेत, सोबतच ९ कोटी रुपये देण्याचंही ठरलं आहे, पण तरी सुद्धा तिची मागणी थाम्बलेली नाही. तिनं केलेल्या आरोपांमुळे पोलिस सतत आपल्या मागावर आहेत, अशी सगळी गोष्ट. हे ट्विट होतं रिपलींग या टेक्नॉलॉजी कंपनीचे को-फाउंडर प्रसन्ना शंकरचं. त्यानं त्याची पत्नी दिव्या शशीधर हिच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचे, आपला छळ केल्याचे आरोप केले आहेत. तर दिव्यानं प्रसन्नानं आपल्यावर अत्याचार केले, छुपे कॅमेरे लावून आपलं रेकॉर्डिंग केलं, असे धक्कादायक आरोप केलेत. पण या दोघांचं हे आरोप प्रत्यारोपाचं प्रकरण नेमकं काय आहे ? पोटगीचा वाद नेमका काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/