#BolBhidu #BalasahebPatil #SahyadriKarkhanaElection नोव्हेंबर २०२४, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. निकालाची आणि काही मतदारसंघांची जोरदार चर्चा झाली. चर्चा झालेल्या मतदारसंघांमध्ये एक होता, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ. सलग ५ टर्म आमदार असलेल्या बाळासाहेब पाटील यांना पराभावाचा धक्का बसला, हा धक्का दिला भाजपच्या मनोज घोरपडे यांनी. निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांना मतं पडली, ९० हजार, तर विजयी मनोज घोरपडेंना मिळालेल्या मतांचा आकडा होता, १ लाख ३४ हजार, म्हणजेच ४३ हजारांचा फरक. कट टू एप्रिल २०२५. कराडच्या यशवंत नगरमध्ये असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली, आजी आमदार मनोज घोरपडे विरुद्ध माजी आमदार बाळासाहेब पाटील असा सामना झाला आणि बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखान्यावर असलेलं आपलं वर्चस्व कायम ठेवत विजय मिळवला. बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनलने सगळ्याच्या सगळ्या २१ जागा जिंकल्या. विधानसभेला मोठ्या फरकाने हरलेल्या बाळासाहेब पाटील यांनी आमदार मनोज घोरपडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या पॅनलला एकतर्फी धक्का दिल्यानं आणि त्यातही बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत हा धक्का दिल्यानं, याची प्रचंड चर्चा होतीये. पण या निवडणुकीत नेमकं काय घडलं ? बाळासाहेब पाटील यांनी विजय कसा मिळवला ? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/