Title - Vithu Mauli Tu Mauli Jagachi Singer - Mahesh Hiremath Label - Ahuja Music Vithu Mauli Tu Mauli Jagachi Lyrics विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || काय तुझी माया सांगु शिरीरंगा संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळचिपळ्यांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || लेकरांची सेवा केलीस तू आई कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला मायबापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||