#BolBhidu #MSDhoni #IPL2025 क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असतं ? ट्रॉफ्या ? नाय. मॅच जिंकवणारा सिक्स, हो म्हणू नका गंभीर ऐकल. कुणाला किती पैसे मिळाले ? ते गोएंका काकांना विचारा. जाऊद्या लय ताणत नाय, क्रिकेटमध्ये महत्त्वाचे असतात आकडे. कुणी पाच ट्रॉफ्या जिंकल्या आहेत म्हणून डायरेक्ट प्लेऑफ खेळत नाही, सुरुवात पहिल्या लीग मॅचपासून करावी लागते. कुणी आधीच्या मॅचला शंभर केला म्हणून, त्याला ११ रनपासून सुरुवात करता येत नाही. बरं त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, हे आकडे ११ जणांचे भारी असावे लागतात, बॅटरच्या नावापुढं ६१ आकडा लागला भारी झालं, बॉलरच्या नावापुढं ६१ आकडा लागला, चला घरला. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की क्रिकेटमध्ये आकडे महत्त्वाचे असतात, क्रिकेटमध्ये एकट्या प्लेअरचे नाही टीमचे आकडे महत्त्वाचे असतात. आकडे मॅचचा रिझल्ट ठरवतात आणि आकडे कुणाची किती मापं काढायची हे सुद्धा ठरवतात. आता शनिवारी चेपॉकवर, सीएसके व्हर्सेस दिल्लीची मॅच झाली. धोनीचे आई वडील पहिल्यांदा आयपीएल मॅच बघायला आले, धोनी सातव्या नंबरला आला, मॅच टप्प्यात होती, पण धोनीला फिनिश जमला का ? तर उत्तर आहे नाही. धोनी गंडला आणि पर्यायानं सीएसके गंडली, ही गंडागंडी झाली या सिझनमध्ये सलग तिसऱ्यांदा. फॅन्स म्हणले, थालानं आता बास करावं, टीम सलग ३ मॅच हारली म्हणल्यावर अशा रिऍक्शन स्वाभाविक आहेत, पण टीम थालामुळेच गंडते का ? उत्तर तुमचं तुम्ही ठरवा आम्ही आकडे सांगायचं काम करतो. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/