HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra. Contact us to report any new as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com अश्विनी बिद्रे यांची हत्या करुन लाकूड कापण्याच्या मशिनने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते वसईच्या खाडीत फेकून दिले, अशी कबुली आरोपी महेश पळणीकरने दिली आहे. नवी मुंबईतील बेपत्ता पोलिस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. बिद्रे यांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले आणि वसईच्या खाडीत टाकले, अशी धक्कादायक कबुली आरोपी महेश पळणीकर याने दिली आहे. अश्विनी बिद्रे प्रकरणाची उकल अंतिम टप्प्यात आली आहे. अश्विनी यांची हत्या करुन लाकूड कापण्याच्या मशिनने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते वसईच्या खाडीत फेकून दिले, अशी कबुली आरोपी महेश पळणीकरने दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक अभय कुरुंदकर, त्यांचा चालक राजू पाटील, कुंदन भंडारी आणि मित्र महेश पळणीकर यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई क्राईम ब्रँचकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आतापर्यंत अश्विनी बिद्रे प्रकरणी फक्त अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता चौघा आरोपींविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 एप्रिल 2016 रोजी चौघा आरोपींनी एकत्र येऊन हत्या केल्याची माहिती आहे. तीनच दिवसांपूर्वी पळणीकरला लाकूड कटर मशिन घरात ठेवल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी बोलावलं होतं. महेश पळणीकर हा अभय कुरुंदकरचा बालपणीचा मित्र असून तो कुरुंदकरचे सर्व व्यवहार करत असे. त्याला पुण्याच्या कात्रज परिसरातून सोमवारी अटक करण्यात आली होती. डिसेंबरमध्ये अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी तपास गुन्हे शाखेकडे देऊन तपास अधिकारी बदली झाल्यावर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी अश्विनीच्या कुटुंबाने केली होती. परंतु नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली नाही. याचा तपास गुन्हे शाखेकडे गेल्यावर इतर आरोपी समोर आले असल्याचा दावा अश्विनीचे पती राजू गोरे यांनी केला आहे. नेमकं काय प्रकरण आहे? 15 एप्रिल 2016 पासून अश्विनी राजू गोरे या महिला पोलिस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्य