#BolBhidu #TahawwurRana #MumbaiAttack तहव्वूर राणा...२६/११ च्या मुंबई हल्याचा मास्टरमाइंड...देशाचा सगळ्यात मोठा शत्रू. ९ एप्रिलच्या रात्री त्याला अमेरिकेतून एका विशेष विमानानं भारतात आणलं जाणार आहे. या संपूर्ण ऑपरेशनवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल स्वतः लक्ष ठेवून आहेत. भारतात आणल्यानंतर राणाला लगेचच एनआयएकडं सोपवणार असून, या दरम्यान दिल्लीतल्या एनआयए कार्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. आता एनआयए काही आठवडे राणाला ताब्यात ठेवणार आहे. तिथं त्याची कसून चौकशी केली जाईल. एएनआयसोबतच मुंबई पोलिसही राणाची चौकशी करणार असल्याचं सांगितलं जातंय. या चौकशीत २६/११ च्या मुंबई हल्ल्याबाबत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणाच्या प्रत्यापर्णाची चर्चा गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू होती. भारत सरकार २०१९ पासून यासाठी प्रयत्न करत होतं. यावर्षी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर या कामाला वेग आला. पण भारताचा कट्टर शत्रू असलेला हा तहव्वूर राणा नेमका आहे कोण? २६/११ च्या मुंबई हल्ल्यात त्याचा काय रोल होता? त्याला अटक कशी झाली? या सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/