#BolBhidu #SunitaWilliams #spacex We are getting our next crew member here, that is none other than sunny williams. Big Smiles and big waves. आपल्या डोळ्यांसमोर काय घडतंय हे समजून सांगणाऱ्या नासाच्या क्रू मेम्बरने हे शब्द उच्चारले आणि त्याचवेळी समुद्रात लँड झालेल्या एका कॅप्सूलमधून एक व्यक्ती बाहेर आली. अंगावर पांढरा स्पेससूट, राखाडी रंगाचे बूट, बॉडी लँग्वेजमधून दिसत असलेला चेहरा आणि तरीही हेल्मेटआडच्या चेहऱ्यावर असलेलं हसू. ९ महिने १३ दिवसांनी अवकाशातुन पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विल्यम्स यांचं हे वर्णन. त्यांचं पृथ्वीवर लँडिंग झालं तेव्हा नासामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, गुजरातमधल्या झुलासन गावात जल्लोष साजरा झाला, हे सगळं घडत होतं, भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे ३ सहकारी अवकाशातून पृथ्वीवर आले, त्यानंतर कॅप्सूलमधून बाहेर आले, हे दृश्य बघायला भारी वाटत होतं. पण त्यांच्या लँडिंगआधी घडलेल्या घटनाही थरारक होत्या, त्यांच्या कॅप्सूलचा तुटलेला संपर्क, समुद्रात स्प्लॅश डाऊन झाल्यानंतर रिकव्हरी क्रूला त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागलेला अर्ध्या तासाचा वेळ अशा अनेक घटना या दरम्यान घडल्या. पण सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कशा आल्या, लँडिंगच्या आधी लँडिंगच्या वेळी आणि लँडिंगनंतर नेमकं काय घडलं ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/