#BolBhidu #TuljapurCase #SangeetaGole तुळजापूर... महाराष्ट्राची कुवस्वामिनी तुळजाभवानीचं देवस्थान. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाला तुळजापूरची ही ओळख माहितीय. पण गेल्या तीन वर्षांपासून इथे अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. पोलिसही या तस्करांचा शोध घेत होते. अखेर १५ फेब्रुवारी २०२५ ला अंमली पदार्थांचं हे रॅकेट उघड झालं. पोलिसांनी अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आणि सुरुवातीला तीन आरोपींना अटक केली. तेव्हापासून या प्रकरणात रोज मोठमोठे खुलासे होतायत, नवनवीन आरोपींची नावं समोर येतायत. या आरोपींचे राजकीय लागेबांधे असल्याचीही चर्चा झाली. पण बुधवारी एक धक्कादायक बातमी आली. तुळजापुरातील अंमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये तुळजापुरातल्या काही पुजाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. त्यामुळं याची चांगलीच चर्चा होत असून संतापही व्यक्त केला जातोय. या पुजाऱ्यांवर कायमची मंदिर प्रवेश बंदी करणार असल्याचंही सांगण्यात आलाय. सध्या या प्रकरणात १४ आरोपींना अटक करण्यात आली असून फरार आरोपींची संख्या तब्बल २१ झालीय. या प्रकरणाचा घटनाक्रम नक्की कसाय, तुळजापुरातील अंमली पदार्थांचं रॅकेट नक्की किती मोठंय, यातल्या आरोपींबद्दल कोणते खुलासे होतायत, पाहुयात या व्हिडिओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/